अनूप मंडल के लिये ई-सकाल द्वारा प्रस्तुत मराठी समाचार जो अण्णा हजारे और सुरेश जैन(शिवसेना) के विरोध को बता रहा है

शनिवार, 6 अगस्त 2011

जळगाव - ""भ्रष्टाचार नष्ट व्हावा, असे सर्वसामान्यांनाही वाटते. त्यामुळे हा सर्वांचाच मुद्दा आहे, तो एकट्या अण्णा हजारेंच्या बापाचा नाही. अण्णा तालिबानी पद्धतीने आपण म्हणेल तेच व्हावे, असा हेका करीत आहेत. त्यामुळे ते गांधी नव्हे; तर तालिबानी गांधी आहेत,'' अशी खरमरीत टीका शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी आज येथे केली.

आमदार जैन यांनी दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात आज हजारे यांनी जळगावच्या न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर श्री. जैन पत्रकारांशी बोलत होते.
आमदार जैन यांनी हजारे यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला. ते म्हणाले, ""भ्रष्टाचार या देशातून पूर्णपणे नष्ट व्हावा, असे मलाही वाटते; परंतु हा मुद्दा केवळ आपलाच असल्याच्या आविर्भावात श्री. हजारे एककल्ली कार्यक्रम राबवीत आहेत.''

अण्णांचे जैनांना आव्हान
"भ्रष्टाचाराचा मुद्दा माझ्या बापाचा नाहीच; परंतु आमदार जैन यांच्या बापाचा असेल, तर त्यांनी त्याविरुद्ध लढावे', असे खुले आव्हान अण्णा हजारे यांनी दिले. आमदार जैन यांनी केलेल्या टीकेनंतर श्री. हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. आमदार जैन यांनी तालिबानी गांधी संबोधल्याबाबत श्री. हजारे म्हणाले, ""फळ असलेल्या झाडाला कुणीही दगड मारतो. त्यामुळे लोक आपल्यावर आरोप करणारच, त्यांच्या आरोपांना आपण उत्तर देत नाही. मात्र, भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांच्या बापाचा असेल, तर त्याविरुद्ध त्यांनी ही लढाई करावी.'

1 टिप्पणियाँ:

आयशा धनानी ने कहा…

खरा आहे पण तुम्हाला मराठी कळतय का?

प्रकाशित सभी सामग्री के विषय में किसी भी कार्यवाही हेतु संचालक का सीधा उत्तरदायित्त्व नही है अपितु लेखक उत्तरदायी है। आलेख की विषयवस्तु से संचालक की सहमति/सम्मति अनिवार्य नहीं है। कोई भी अश्लील, अनैतिक, असामाजिक,राष्ट्रविरोधी तथा असंवैधानिक सामग्री यदि प्रकाशित करी जाती है तो वह प्रकाशन के 24 घंटे के भीतर हटा दी जाएगी व लेखक सदस्यता समाप्त कर दी जाएगी। यदि आगंतुक कोई आपत्तिजनक सामग्री पाते हैं तो तत्काल संचालक को सूचित करें - rajneesh.newmedia@gmail.com अथवा आप हमें ऊपर दिए गये ब्लॉग के पते bharhaas.bhadas@blogger.com पर भी ई-मेल कर सकते हैं।
eXTReMe Tracker

  © भड़ास भड़ासीजन के द्वारा जय जय भड़ास२००८

Back to TOP